घरदर्शक शब्द

घरदर्शक शब्द

घरदर्शक शब्द:- 
    प्राणी, मनुष्य यांच्या बाळांना ज्याप्रमाणे नावे आहेत तशीच घरांना देखील नावे आहेत. त्यांना घरदर्शक शब्द असे म्हणतात. ज्याप्रमाणे मनुष्य हा प्राणी घरामध्ये राहतो. त्याच प्रमाणे इतर प्राणी देखिल त्याच्या कुवती प्रमाणे घरे बांधतात आणि त्यात राहतात किंवा माणसे त्यांनी पाळलेल्या पाळीव प्राण्यांकरिता जे घर बनवतात त्या मध्ये हे पाळीव प्राणी राहतात त्यांची घरे व घरदर्शक शब्द खाली दिलेली आहेत.
  1. पक्षी - घरटे,कोटर
  2. चिमणी - घरटे
  3. कावळे - घरटे
  4. हत्ती - हत्तीखाना, पिलखाना, अंबरखाना
  5. मुंगी - वारूळ
  6. गुरे - गोठा
  7. घुबड - ढोली
  8. माणूस - घर
  9. गाय - गोठा
  10. साधू, ऋषी - आश्रम, कुटीर
  11. कासव – तलाव, विहिर
  12. पोपट - ढोली, पिंजरा
  13. राजा - राजवाडा, महाल
  14. उंदीर - बीळ
  15. कोंबडी - खुराडे
  16. मधमाशा - पोळ, मोहोळ
  17. म्हैस - गोठा
  18. घोडा - पागा, तबेला
  19. सिंह - गुहा
  20. वाघ - गुहा, जाळी
  21. साप - वारूळ,बीळ
  22. ससा - बीळ
  23. नाग - वारूळ
  24. अस्वल - घळी
  25. मेंढी - मेंढवाडा, कोंडवाडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा