.
अनेकार्थी शब्द म्हणजे काय?
नावावरूनच अर्थ लक्षात येतो की अनेकार्थी = अनेक+अर्थ. म्हणजेच ज्या शब्दाचे एका पेक्षा अनेक अर्थ असतात किंवा ज्या शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात त्या शब्दास 'अनेकार्थी शब्द' असे म्हणतात. अनेकार्थी शब्दाला वेगवेगळे अर्थ असू शकतात. या शब्दांचे भिन्न भिन्न अर्थ निघत असल्यामुळे हे शब्द भाषेत योग्य प्रकारे वापरणे, काळजी पूर्वक वापरणे गरजेचे असते.
पुढील लेखात विविध अनेकार्थी शब्द दिलेले आहेत. या शब्दांना ७ गटामध्ये विभागले आहे. ते गट म्हणजे - १) देवी देवता २) मनुष्य ३) मानवी भावना ४) निसर्ग व पर्यावरण ५) प्राणी ६) पदार्थ व वस्तू ७) इतर शब्द
देवी व देवता:-
इंद्र - देवेंद्र, सुरेंद्र, अमरेंद्र, वज्रपाणि, सहस्राक्ष, वसावा, पुरंदर, शक्र, सोमपा, मेषवृषण.
गणपती - गणेश, गजानन, लंबोदर, वक्रतुंड, गणराज, विघ्नहर्ता, भालचंद्र, एकदंत, गजवदन, गजमुख, हेरंब, गौरीपुत्र, गौरीनंदन, गौरीतनय, विघ्नहारी, मंदार, विनायक, अक्षय, चिंतामणी, प्रथमेश, वरद, अनामय, अमेय, ओमकार.
देव - ईश, ईश्वर, सुर, अमर, प्रभू, श्री, परमेश्वर, भगवान, निर्जर (वृद्ध न होणारा), अलक्ष (ज्याला सामान्य डोळ्याने पाहू शकत नाही असा सूक्ष्म- अपभ्रंश अलख), अलख, प्रभू, त्रिदश, दैवत, परमात्मा, भगवंत, निर्माता.
लक्ष्मी - इंदिरा, कमला, पद्मा, पद्मालया, हिरण्मयी, हरिवल्लभी, पद्मप्रिया, पद्महस्ता, पद्माक्ष्य, पद्मसुन्दरी, पद्मोद्भवा, पद्ममुखी, पद्मनाभप्रिया, रमा, पद्ममालाधरा, पद्मिनी, इन्दुशीतला, दारिद्र्यनाशिनी, हेमा.
शंकर - शिव, शंभू, महादेव, नीलकंठ, गंगाधर, पशुपती, कैलासपती, केदार, महेश, सांब, सदाशिव, भालचंद्र, चन्द्रशेखर, त्रीनेत्र, भालचंद्र, त्र्यंबक, रुद्र, हर.
विष्णू - श्रीपती, रमेश, चक्रपाणि, नारायण, माधव, केशव, गोविंद, अच्युत, मधुसूदन, पद्मनाभ, जनार्दन, हरी, बालाजी, व्यंकटेश, श्रीधर, हृषीकेश, अनिरुद्ध, पुरुषोत्मन, उपेंद्र.
देऊळ - मंदिर, देवालय, राऊळ, देवस्थान, देवघर.
राक्षस - दैत्य, दानव, असुर.
कामदेव - कंदर्प, काम, कुसुमचाप, कुसुमशर, पुष्पधन्वा, मकरध्वज, मदन, मनोज, मनोभव, मीनकेतन, स्मर, अनंग.
हनुमान - अंजनिनंदन, कपी, पवनपुत्र, पवनसुत, बजरंगबली, मारुती, मारोती, हनुमंत.
दुर्गा - अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा.
ब्रह्मा - चतुरानन, ब्रह्मदेव, विधाता, वीरिंची, वेदनाथ, चतुर्मुख, स्वयंभु, विधी.
अर्जुन - पार्थ, धनंजय, भारत, फाल्गुन.
मनुष्य प्राणी समंधित
अंग - शरीर, देह, तनू, काया, धड, कुडी, तन, वपू.
अंगारा - विभूति; रक्षा, राख.
अध्यापक - शिक्षक, गुरुजी, मास्तर, गुरु.
अनाथ - असहाय, निराधार, निराश्रित, पोरका, बेवारशी.
अभिनेता - नट.
आई - माता,माय, माउली, जननी, जन्मदात्री, जन्मदा, मातोश्री, मातृ.
आजारी - पीडित, रोगी.
आयुष्य - जीवन, हयात, आयू, जीवनकाल, हयात, जीवित.
आरोप - कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग, बट्टा.
आरोपी - गुन्हेगार, अपराधी, अभियुक्त.
कपाळ - भाल, ललाट, निढळ, कपोल, मस्तक, शिर, माथा.
कान - कर्ण, श्रोत्र, श्रवण, श्रवनेंद्रिये.
कुटुंब - परिवार, खटला.
जनता - लोक, प्रजा, रयत, प्रजाजन, जन, नागरिक.
डोके - शीर, मस्तक, माथा, शीर्ष, मुर्धा, सिसाळ.
डोळा - अक्ष, चक्षू, नेत्र, नयन, लोचन, अक्षी, आंख.
तोंड - मुख, तुंड, आनन, वदन,चेहरा,मुद्रा,थोबाड, चर्या, मुखमंडल.
दात - दंत, दांतवली.
नवरा - वर, पती, भ्रतार, कांत, वल्लभ, नाथ, कारभारी, घरधनी, दादला,अम्बुला, भर्ता, धनी, मालक, स्वामी, यजमान.
नवरी - वधू, पत्नी, भार्या, बायको, कांता, वनिता, जाया, गृहिणी, कारभारीण, घरधनीण, अर्धांगीनी, कुटुंब, दारा, कलत्र, अंगना, अस्तरी, धर्मपत्नी, बाईल, सहचारिणी, अस्तुरी, सहधर्मिणी, सहधर्मचारिणी.
नाक - घ्राण, घ्राणेंद्रिय, नासा, नासिका, श्वसनेंद्रिय.
नातेवाईक - आप्त, आप्तेष्ट, नातलग, भाऊबंद, संबंधी
नोकर - चाकर, गुलाम, सेवक, किंकर, दास, अंकित, आश्रित, बंदिवान.
पाय - पद, पाद, पाऊल, चरण.
पुढारी - नेता, नायक, अग्रणी, धुरीण, म्होरक्या, अर्ध्वयु.
बहीण - भगिनी, सहोदरा.
बाप - पिता , वडील , जनक, बाबा, तात, जन्मदाता, तीर्थरूप.
बाळ - बालक, मूल.
ब्राह्मण - द्विज, विप्र.
भाऊ - बंधु, भ्राता, सहोदर.
माणूस - मनुष्य, मनुज, मानव.
मित्र - सोबती, सवंगडी, साथीदार, खेळगडी, स्नेही, सखा, दोस्त, यार, भिडू, साथी, सोबती, सुहृद.
मुलगा - पुत्र, सुत, तनय, नंदन, लेक. कुमार, आत्मज, पोरगा, लेक, तनुज, चिरंजीव, छोकरा, पोर.
मुलगी - लेक, कन्या, पुत्री, तनुजा, आत्मजा, सुता, कुमारी, पोरगी, तनया, दुहिता, नंदिनी, बेटी.
राजा - भूप, भूपती, भूपाल, भूमिपती, नृप, नृपती, नृमणी, सम्राट, नरेश, राणा, महाराजा, प्रजापती,महिपाल, पृथ्वीराज, राय, राया, राऊ, राजेंद्र, नरेंद्र, नरपती, नराधिप.
राणी - महाराणी, राजपत्नी, राज्ञी, सम्राज्ञी.
वडील - बाप, पिता, जनक, जन्मदाता, तात, पिताश्री, पितृ.
वाटसरू - मार्गिक, पथिक, यात्रिक.
वृद्ध - म्हातारा, वयस्कर, वयोवृद्ध.
व्यक्ती - माणूस, असामी, इसम, पठया.
शत्रू - वैरी, रिपू,, गनिम, दुष्मन, अरी.
शास्त्रज्ञ - वैज्ञानिक.
शेतकरी - कृषिक, कृषीवल.
स्त्री - महिला, अबला, ललना, कामिनी, रमणी, अंगना, अनंगा नारी, वनिता, नार, बाई.
हात - कर, भुज, बाहू, हस्त, पाणि.
हृदय - अंतर, चित्त, मन, अंतःकरण.
मानवी भावना
आनंद - मोद, हर्ष, आमोद, तोष, संतोष, प्रमोद, प्रफुल्ल, उल्हास, उद्धव, सुख, समाधान, तृप्त, खुश, तृप्तता.
चिक्कू - कंजूष, कृपण, कवडीचुंबक.
भीती - भय.
मृत्यू - अंत, जीवनांत, शेवट.
कुतूहल - आश्चर्य, नवल, अचंबा, विस्मय, अचरज, आचोज, चकित
दुष्ट - वाईट, असाधू, खल, दुर्जन.
भान - लक्ष, ध्यान.
मन - मानस, चित्त, अंतर, अंत:करण, हृदय, अंतरंग, अंतरात्मा
शक्ती - बल, ताकद, सामर्थ्य, कुवत, जोर, जोम.
विश्वास - खातरजमा, खात्री, ग्वाही, निश्चिती, भरवसा, भरोसा, हमी.
माया - प्रेम, ममता, वात्सल्य, जिव्हाळा. .
हौस - आवड, गोडी, शौक
ऐट - रुबाब, डौल
दुःख - शोक, पीडा, यातना, वेदना, कळ, ताप.
प्रयास - प्रयत्न, यत्न
द्वेष - हेवा, मत्सर, तिरस्कार, तिटकारा, तुच्छता, घृणा, उबग, वीट.
प्रेम - प्रीती, लोभ, माया, अनुराग, अनुरती.
सुंदर - सुरेख, रम्य, रमणीय, मनोहर, नेत्रदीपक, अभिराम, लावण्यामय, मोहन, देखणे, ललित.
वैभव - ऐश्वर्य, श्रीमंती, समृद्धी, दौलत, संपन्न
संघर्ष - कलह, भांडण, झगडा.
शिक्षण - विद्या, विद्याभ्यास, ज्ञान, अध्ययन.
उन्नती - प्रगती, विकास, उत्कर्ष, भरभराट, अभ्युदय.
दर्जा - अधिकार, हुद्दा, प्रत, स्तर, स्थान, पातळी.
महिमा - महती, थोरवी, माहात्म्य, महानता, श्रेष्ठत्व, मोठेपणा.
वंदन - अभिवादन, नमस्कार, नमन, प्रनाम, दंडवत, सलाम.
पवित्र - शुद्ध, विशुद्ध, निर्मळ, विमल, शुचि, धूत.
कर्तृत्व - कार्य, कृती, कामगिरी, कर्तबगारी, करामत.
शर्यत - होड, पैज, स्पर्धा, पण.
स्वच्छ - निर्मळ, निर्लेप निष्कलंक, साफ.
स्मरण - आठवण, सय, आठव, स्मृती.
प्रार्थना - अर्चना, आराधना, आळवणी, याचना, विनवणी.
तल्लीन - गर्क, गुंग, दंग, मग्न, निमग्न, व्यग्र.
संधी - मोका, योग, सोय, पर्वणी, काळवेळ.
प्रभुत्व - स्वामित्व, हुकूमत, ताबा, पकड, पगडा, अधिराज्य.
आक्रोश - आक्रंदन, आकांत, विलाप, टाहो, शोक, क्रंदन
शहाणपण - बुद्धी, अक्कल, हुशारी, जाण, सुज्ञपण, समज
लाज - लज्जा, शरम, भीड, हया, मर्यादा, संकोच, बुजरेपणा
धैर्य - अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
राग - अंगार, कोप, क्रोध, चीड, रोष, संताप
ईर्षा - अकस, असूया, आकस, ईर्ष्या, चडफडाट, पोटदुखी, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर, हेवा
आळस - ढिलाई, ढील, मंदपणा, सुस्तपणा, सुस्ती, हयगय
बावळट - अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शंख, शुंभ
हलकट - नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, लुच्चा
क्षेम - कुशल, कल्याण, हित
निसर्ग व पर्यावरण
अरण्य - रान, वन, कानन, विपीन, जंगल, अटवी, कांतार.
अंधार - काळोख, तम, तिमिर, अंधकार,
आकाश - आभाळ, गगन, नभ, अंबर,व्योम, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, ख, तारांगण, आस्मान, वियत , वितान, खगोल
उद्यान - बगीचा, बाग, वाटिका उपवन
कमळ - पंकज, अंबुज, राजीव, सरोज, उत्पल, पंकेरुह, नलिनी, अप्पज, नीरज, पद्म. अळत, अंभोज , अरविंद, अब्ज
किनारा - तट, काठ, तीर, थड, थडी, किनारपट्टी.
खडक - दगड, पाषाण, प्रस्तर, धोंडा
घर - गृह, सदन, भवन, निवास, धाम, गेह, आलय, निकेतन, छत्र, आसरा, आवास, आयतन
चंद्र - शशी, सोम, इंदू, सुधा, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, चंद्रमा, चंद्रम, हिमांशू, सुधांशू, शशांक, रजनीवल्लभ, रजनीकांत, विधू.
चांदणे - कौमुदी, चंद्रिका, जोत्स्ना, रश्मीजाल
जमीन - भू, भूमी, भुई, धरा, धरणी.
झरा - निर्झर, धबधबा, ओहळ.
झाड - वृक्ष, तरू, पादप, द्रुम, भूधर, रुख
ढग - मेघ, घन, जलद, पयोधर, अभ्र, नीरद, पयोद अंबुद अब्द, जलधर, महुडा.
तलाव - तळे, तटाक, सरोवर, तडाग.
दिवस - वार, रोज, दिन, वासर, अह
नदी - सरिता, तटिनी, जलवाहिनी, लोकमाता, हिमकन्या, निर्झरिणी, तरंगिणी.
नारळ - श्रीफल, नारिकेल, त्रिनेत्र.
पर्वत - गिरी, अद्री, नग, अचल, शौल, अग्र, गिरी, शैल, पहाड, भुशीर,
पाऊस - वर्षा, पर्जन्य वृष्टी वरुण शिरवे
पाणी - जल, पय, तोय, वारी, नीर, अंबु, जीवन, सलील उदक आप
पान - पर्ण, पत्र, दल, पल्लव.
पियुष - अमृत, सुधा, संजीवनी, पय.
पृथ्वी - जमीन, धरणी, धरती, धरित्री, धरा, वसुधा, वसुंधरा, भुई, मही, क्षमा, भू, भूगोल, भूमाता, अवनी, भूमी, रसा.
प्रकाश - तेज, आभा, प्रभा, उजेड, ओजपाणी, झळाळी
फूल - सुमन, पुष्प, कुसुम, सुम
बाग - उपवन, उद्यान, वाटिका, बगीचा, पुष्पवाटिका, पुष्पवन
माती - मृत्तिका, मृदा
मार्ग - रस्ता, वाट, पथ, सडक, मार्ग, वाट, पथ, पंथ, पांद
रात्र - रजनी, निशा, यामिनी, विभावरी, रात, तमिस्त्रा.
वारा - वायू, वात, अनिल, पवन, समीर, मारुत, समीरण.
विस्तव - आग, अग्नी, आनल, पावक, वन्ही, वैश्वानर.
वीज - बिजली, चंचला, चपला, तडिता, विद्युत, विद्युल्लता, सौदामिनी.
समुद्र - दर्या, सागर, रत्नाकर, सिंधू, निरधि, पयोधि, अंबुनि, जलधि, अदधी, अर्णव, अंबूधी, वारिराशी.
सुगंध - वास, सुवास, गंध, परिमल, सुरभी.
सूर्य - मित्र, भानु, पुण्य, हिरण्यगर्भ, मरिच, आदित्य, सविता, अर्क, भास्कर, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, नारायण, अरुण, अर्णव, वासरमणी, रवी, दिवाकर, सहस्त्रकर, सहस्त्ररश्मी, मार्तंड, चंडांशू
सृष्टी - चराचर, जग, भूगोल, दुनिया.
होडी - नाव, नौका, गलबत, तर, जहाज
वादळ - वावटळ, जौळ, झंझावात, प्रभंजन, आवर्त, वायुक्षोभ.
किल्ला - दुर्ग, गड
प्राणी
उंदीर - मूषक
कावळा - काक, वायस, एकाक्ष.
कुत्रा - श्वान, कुक्कुर,
कोल्हा - श्रृगाल
गरुड - द्विजराज, खगेंद्र. खगेश्वर, ताय, वैनतेय
गाय - गो, गोमाता, धेनू, नंदिनी.
घोडा - अश्व, हय, तुरुंग, वारू. वाजी, तुरग, तुरंग
पक्षी - द्विज, खग, विहंग, नभचर, अंडज, पाखरू, विहंगम
पोपट - शुक, राघू, रावा, कीर मिठ्ठू.
बेडूक - मंडुक, भेक, दुर्दर
बैल - पोळ, पुंगव, नंदी, वृषभ, खोड, बलिवर्द.
भुंगा - भ्रमर, मधुकर, मिलिंद, अली, भृंग, षट्पद, द्विरेच, मधूप
माकड - वानर, कपी, मर्कट, शाखामृग
मासा - मत्स, मीन, झक.
मोर - मयूर, केका.
लांडगा - वृक
वाघ - व्याघ्र, शार्दुल
साप - सर्प, भूजंग, नाग, तक्षक. अही व्याळ , पन्नग , फनी, उराग
सिंह - केसरी, वनराज, शार्दूल, मृगेंद्र, पंचानन, वनकेसरी, वनाधिपती, मृगराज
हत्ती - गज, कुंजर, वारण, गजराज, नाग, सारंग, रदी, द्विरद, दंती गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, वारण.
हरीण - मृग, सारंग, कुरग, काळवीट.
पदार्थ व वस्तू :-
धनुष्य - चाप, कोदंड, चार्मुख, धनू, तीरकमठा.
बाण - शर, तीर, सायक.
पाकळी - दल
पैसा - धन, दौलत, संपत्ती, अर्थ, माया, रक्कम, पैसा, रुपये, दाम.
होडी - नाव, नौका, जलतरंगिणी.
लोणी - नवनीत.
मीठ - लवण.
दूध - दुग्ध, पय, क्षीर.
मध - मधू, मकरंद.
दही - दधी
सोने - सुवर्ण, कनक, कांचन, हेम.
पुस्तक - ग्रंथ, पोथी, पुस्तिका, चोपडी, बाड.
आरसा - दर्पण, आईना, ऐना, मुकुट, आदर्श.
वस्त्र - कपडा, कापड, पट, वसन, अंबर, वेश, पोशाख, प्रावरण
इतर शब्द :-
शहर - नगर, पूर, पुरी.
लढाई - युद्ध, रण, समर, संगर, संग्राम, द्वंद्व, झुंज,
तुरुंग - कारागृह, बंदिशाळा.
अमीर - श्रीमंत, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, सधन, समृद्ध
छाया - सावली
अवघड - कठीण, असाध्य, बिकट, खडतर.
श्रम - कष्ट, मेहनत
अशिक्षित - अडाणी, निरक्षर
सुरुवात - आरंभ, प्रारंभ, नांदी, सुतोवाच, ओनामा, श्रीगणेशा.
अंत - शेवट, समाप्त
प्रसिद्ध - लोकप्रिय
विश्व - जग
अचानक - अनपेक्षित, आकस्मिक
शिक्षा - दंड, सजा
बक्कळ - खूप, पुष्कळ, भरपूर, लई, मायदळ, असंख्य, अगणित, अनंत, विपुल.
विष - जहर, हलाहल, गरळ.
वचन - शपथ, आण, प्रतिज्ञा, अभिवचन, हमी, शब्द.
उशीर - दिरंगाई, विलंब, खोळंबा, खोटी, चालढकल
गोष्ट - कहाणी, कथा, हकीकत, आख्यान, सांगी
प्रदेश - मुलुख, परिसर, मोहल्ला, प्रांत.
गाव - ग्राम, खेडे, मौजे, महल, पेठ, कसबा, वस्ती.
सैन्य - लष्कर, सेना, दल, फौज
युद्धभूमी - धारातीर्थ, रणक्षेत्र, रणभूमी, रणांगण, समरभूमी, समरांगण
दुर्दैव - कमनशीब, दुर्भाग्य, नष्टचर्य, निदैव
संधी - तह, समझोता
किंचित - अंमळ, अमळ, जरा, थोडा, थोडासा, यत्किंचित
हलका - अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, वाईट, हीन
संहार - विनाश, नाश
सर्व - समस्त, अखिल, सकल
200 पेक्षा अधिक अनेकार्थी शब्द pdf स्वरूपात डाउनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा