विरामचिन्हे: विरामचिन्हांचे प्रकार, विरामचन्हांचा उपयोग

विरामचिन्ह (Viramchinhe)

    मनुष्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला मधून मधून थांबावे लागते, कारण नैसर्गिक श्वासोश्वासाच्या क्रियेने असे घडते. या थांबण्याला 'विराम' असे म्हणतात. लिहिणारा आपले विचार लिहिताना ती वाचणाऱ्याने कसे वाचावे म्हणजेच त्याने वाचताना कुठे थांबावे हे लिहिणाऱ्याला ज्या चिन्हाच्या साह्याने दाखवता येते त्या चिन्हांना 'विरामचिन्हे' म्हणतात. ज्यावेळी आपला विचार लिहून दाखविला जातो त्यावेळी हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निर्णय दाखवावा लागतो त्यांनाच 'विरामचिन्ह' (Viramchinh) म्हणतात. विरामचिन्हामुळे वाक्य कोठे संपले? कोठे सुरू झाले? की अपूर्ण आहे, अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून विरामचिन्हाने लेखनात महत्त्व असते. अशा चिन्हांचा वापर केव्हा, कोठे करावा समजून घ्यावे लागते.

विरामचिन्हाचे प्रकार

विरामचिन्हाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. 1) विराम दर्शवणारी 2) अर्थबोध दर्शवणारी
  • विराम दर्शवणारी विरामचिन्ह :-ज्या चिन्हातून वाक्यात विराम अथवा थोडा अवकाश दर्शविला जातो ते म्हणजे विराम दर्शविणारी चिन्हे होत. उदाहरणार्थ पूर्णविराम (Purn Viram),अर्धविराम(Ardh Viram), स्वल्पविराम(Swalpviram) इत्यादी.
  • अर्थबोध करणारी विरामचिन्ह :- ज्या चिन्हांमधून वाक्याचा अर्थ बोध होण्यास मदत होतो ती म्हणजे अर्थबोध करणारी विराम चिन्हे होय. उदाहरणार्थ प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह इत्यादी.

  • हे सुद्धा पहा: लिंग व लिंगाचे प्रकार
                        मराठी वाक्प्रचार

    पूर्वी मराठी ही मोडी लिपीत लिहिल्या जात असे. मोडी लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्ये सुद्धा फक्त 'दंड' (|) हे एकाच विरामचिन्ह होते. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हीच पद्धत सर्वमान्य झाली आणि रूढ झाली. विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून लिहिल्या जातात फक्त अपवाद म्हणजे अपूर्ण विराम होय. अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर पुढे शब्द असल्यास एक जागा सोडूनच पुढचा शब्द लिहितात.

चिन्हाचे नाव चिन्ह केव्हा वापराल / कोठे वापराल? उदाहरण
पूर्ण विराम
(Full Stop)
(.) विधान अथवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी
वाक्य किंवा विधानाच्या शेवटी वापरतात.
मी अभ्यास करीत आहे.
मोर नाचत आहे.
शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याआक्षरांपुढे वापरतात.
पण जेव्हा शब्दांचा संक्षेप एकदम उच्चारल्यास बोलतांना विराम येत नाही तेव्हा
चिन्ह वापरत नाही. जसे: जेडी,केपी
वि.वा. शिरवाडकर,
व्ही.व्ही.देव
अर्धविराम
(Semi Colon)
(;) दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात. यात विचार अपूर्ण राहतो म्हणून न्यूनत्व दिसते व
अर्धविराम येतो.
गड आला; पण सिंह गेला.
रामने खूप अभ्यास केला; परंतु त्याला चांगले गुण मिळाले नाही.
स्वल्पविराम
(Comma)
( , ) एकाच जातीचे किंवा भिन्न जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. गंगा, यमुना, सरस्वती या भारतातील प्रमुख नद्या आहेत.
सम संख्या - 2,4,6,8,10,12,14
हाक मारताना संबोधन दर्शवितांना आज्ञा देताना नावापुढे वापरतात. संगिता, पुस्तक दे.
प्रमोद, इकडे ये.
अपूर्णविराम
विसर्गाचा अपूर्ण विराम
(Colon)
(:) वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. पुढिल क्रमांकाचे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले:
3,6,8,13,15,22.
एका वाक्यात यादी स्वरुपात तपशिल द्यायचा असल्यास वापरतात.(हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही. नामाचे प्रकार:सामान्य नाम. विशेष नाम, भाव वाचक नाम इत्यादी
प्रश्नचिन्ह
(Question mark)
(?) प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी या विरामचिन्हाचा वापर करतात. तू कुठे गेला होतास?
गणेश काय करतआहे?
तुला चित्रपट कसा वाटला?
उद्गारचिन्ह
(exclamatory)

(!) मनातील भावना आश्चर्य व्यक्त करण्यासाठी उद्गार जीवनाचा
वापर केला जातो
बापरे! केवढा मोठा हत्ती आहे.
अरे! तू खूपच उशिरा आलास.
अवतरण चिन्ह एकेरी
(Single inverted comma)
('..') एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत
सांगताना वापरतात
गांधीजींनी चले जाओ ची घोषणा दिली.
दुहेरी   अवतरण चिन्ह
(Double inverted comma)
("..") बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहिताना
दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो.
शरद म्हणाला, "मी सहलीला येईल."
संयोग चिन्ह
(Hyphen)
(-) दोन शब्द जोडताना या चिन्हाचा वापर करतात. प्रेम-विवाह
होळीच्या शेवटी शब्द पुरा राहिल्यास याचा वापर करून उर्वरित शब्द
खाली लिहिला जातो
विद्यार्थी प्रतिनिधी मला निबंध लिहा-
यला सांगितले.
अपसारण चिन्ह (Dash)
स्पष्टीकरण चिन्ह
(–) बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे
असल्यास या चिन्हाचा वापर करतात. एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायचे
असल्यास त्यापुढे अपसारण चिन्हाचा वापर करून स्पष्टीकरण देता येते.(हे चिन्ह संयोगचिन्हाच्या दुप्पट असते.)
ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे– ती पहिली आली.
मी घरातून निघालो पण तो मनुष्य – ज्याने मला
कार्यालयत सोडले – तो आपल्याच कार्यालयात होत.
कंस
(Bracket)
() एखाद्या शब्दाबद्दल विशिष्ट्य माहिती द्यायची असल्यास किंवा त्याचे इतर माहिती सांगायची असल्यास कंसाचा वापर करतात. कुंजबिहारी (कृष्ण)

हे सुद्धा पहा: शब्द सिद्धी: तत्सम, तद्भव व देशी शब्द

इतर काही चिन्हे व त्याचा वापर 

  • पूर्वीच्या काळी साहेबचे संक्षिप्त रूप लिहिल्यासाठी 'सो' च्या पुढे एक जास्तीचा काना (|) वापरीत.
  • उदा० 'दादासाहेब'साठी दादासोा. अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत मामासाहेबसाठी मामासोा, तात्यासोा असेच लिहितात. 
  • तिरपा डॅश (Tirapa Dash): 'किंवा' या शब्द वापरण्या ऐवजी तिरपा डॅश (/)वापरतात. 
    उदा. १)येथे विद्यार्थी/विद्याथीनीचे नाव लिहावे. २)निळ्या/काळ्या शाहीच्या पेनचा वापर करावा. ३)आई/वडिलांची सही आणावी.
  • काकपद चिन्ह (^): लेखनात एखादा शब्द विसरला अथवा लिहायचा राहिला असल्यास तो ज्या दोन शब्दाच्या मध्ये हवा होता तेथे काकपद चिन्ह देऊन ओळीच्या वर विसरलेला शब्द लिहितात.
  • उदा.                           मूर्ख 
             रजत एक अतिशय ^माणूस आहे.
  • लिखाणामध्ये ग्रंथात/पुस्तकांत खुलासे परिशिष्टात केले असतील तर जितके खुलासे असतील त्यांना क्रमाने नंबर दिले जातात व ते शब्दाच्यापुढे घातांकासारखे लिहिण्याची पद्धत आहे.
  • उदा. अजातशत्रू 1,नचिकेत²,विद्याभारती³ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा