अनुप्रास अलंकार (Anupras Alankar)
जेव्हा कवितेच्या एखाद्या चरणात, ओळीत अथवा वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. तेव्हा 'अनुप्रास अलंकार' होतो. अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे त्यातील नादामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. अनुप्रास अलंकारला इंग्रजीमध्ये 'Alliteration' असे म्हणतात.
अनुप्रास अलंकारची उदाहरणे व त्याची स्पष्टीकरण
- देवा दीनदयाळा
 दूर द्रुत दास
 दु:ख दूर दवडी
 शांतीच मज दे
 स्पस्टिकरण: यामध्ये 'द'या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे.
- आज गोकुळात रंग खेळतो हरी
 राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
 स्पष्टीकरण: या गाण्यात ज ह्या अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली आहेत. त्यामुळे येथे नाद निर्माण होतो. त्याकारणाने येथे अनुप्रास अलंकार होतो.
- बालिश बहू बायकात बडबडला.
 स्पष्टीकरण: वरील वाक्यात 'ब' अक्षराची पुनरावृत्ती होत असल्याने येथे अनुप्रास अलंकार होतो.
- अनंत मरणे आधी मरावीं,
 स्वातंत्र्याची आस धरावी,
 मारिल मरणचि मरणा भावी,
 मग चिरंजीवपण ये बघ तें.
 स्पष्टीकरण: या चरणात 'म' या अक्षराची पुनरावृत्ती होऊन अनुप्रास अलंकारची निर्मिती झाली आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा