अलंकार: उत्प्रेक्षा अलंकार उदाहरण स्पष्टीकरणासह

उत्प्रेक्षा अलंकार 

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो, त्यातील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमानच) आहे. अशी कल्पना असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. जेव्हा उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णीलेले असते, तेव्हा तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. या अलंकारांमध्ये उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता दर्शवण्यासाठी जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यदर्शक शब्द वापरले जातात.
उदाहरणार्थ :-
  1. हा आंबा जणू साखरच!
  2. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
  3. त्याची अक्षर जणू काय मोतीच!
  4. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!
  5. अत्रीच्या आश्रमी नेलें मज वाटे खरेखुरे
  6. किती माझा कोंबडा मजेदार
    मान त्याची कितीतरी बाकदार
    शिरोभागी तांबडा तूरा हाले
    जणू जास्वंदी फूल उमललेले
    अर्धपायी पंढरीशी विजार
    गमे विहंगातील बडा फौजदार
    स्पष्टीकरण:- कोंबड्याचा
  7. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे
    मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे
  8. जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या साधी निसर्ग सुंदर भासे ती देवता जाणो वन्या 
  9.  हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना, तो जणू कर्दनकाळ भासत होता.
  10. तिच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाट खरेखुरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा