७५+ समुहदर्शक शब्द

समुहदर्शक शब्द( Samuhadarshak shabd)

  वस्तू प्राणी व्यक्ती इत्यादींच्या समूहा करिता जो शब्द वापरला जातो त्या शब्दास समूहदर्शक शब्द असे म्हणतात. मराठी व्याकरणातील (Marathi Vyakaran) हा एक महत्वाचा घटक आहे. विविध स्पर्धा परीक्षा (competetive exam), स्कॉलरशिप परीक्षा (scholarship exam), नवोदय परीक्षांमध्ये(Navoday exam) या घटकावर प्रश्न दिलेले आढळून येतात. स्पर्धा परीक्षेत रिकाम्या जागा भरा किंवा बहुपर्यायी प्रश्न या घटकावर विचारले जातात. सदर लेखात ७५ पेक्षा अधिक अत्यंत उपयुक्त असे समूहदर्शक शब्दाची उदाहरणे दिलेली आहेत. सदरील शब्दांचा अभ्यासमुळे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यास सहाय्य मिळेल.

  1. आंब्यांच्या झाडांची - राई
  2. उंटांचा, लमाणांचा - तांडा
  3. उतारुंची - झुंड
  4. उदबत्त्यांचा - पुडा
  5. उपकरणांचा - संच
  6. उसाचा - फड
  7. काजूची, माशांची - गाथण
  8. करवंदांची - जाळी
  9. कापडाचा - तागा
  10. किल्ल्यांचा - जुडगा
  11. कुस्त्यांचा - फड
  12. केळीच्या झाडांची - बाग
  13. केळीचे - बन
  14. केळ्यांचा - घड, लोंगर, फणी
  15. केवड्याचे - बन
  16. केसांचा - टोप, झुबका, पुंजका
  17. केसांची - बट, जट
  18. खेळाडूंचा - संघ
  19. गवताचा - भारा, तुरा
  20. गवताची - गंजी, पेंढी, पेंड
  21. गाईगुरांचे - खिल्लार
  22. गुरांचा - कळप
  23. चोरांची, दरोडेखोरांची - टोळी
  24. जहाजांचा - काफिला
  25. ज्वारी, बाजरी, मका - कणीस
  26. डॉक्टरांचे - पथक
  27. तारकांचा - पुंज
  28. तारेचे, दोरीचे - बंडल
  29. तार्‍यांचा - पुंजका
  30. दगडांचा - ढीग
  31. दुर्वांची – जुडी
  32. द्राक्षांचा, - घड, घोस
  33. धान्यांची - रास
  34. धान्यांची - ढीग
  35. नारळांचा, विटांचा, कलिंगडांचा - ढीग
  36. नोटांचे - पुडके
  37. पक्षांचा - थवा
  38. पत्रावळींचा - ढीग, गठ्ठा
  39. पाखरांचा, पक्षांचा - थवा
  40. पाठ्यपुस्तकाचा - संच
  41. पालेभाजीची - गड्डी, जुडी
  42. पिकत घातलेल्या आंब्यांची - अढी
  43. पुस्तकांचा - संच
  44. पोत्यांची - थप्पी
  45. प्रवाशांची - झुंबड
  46. प्रश्नपत्रिकांचा - संच
  47. फळांचा - ढीग, घोस
  48. फुलझाडांचा - ताटवा
  49. फुलांचा - गुच्छ, हार, गजरा
  50. फुलांची - माळ, वेणी
  51. बांबूचे - बन, बेट
  52. बालवीरांचा - मेळावा
  53. बैलगाड्यांची - रांग
  54. भाकर्‍यांची - चवड
  55. भाजीची - जुडी, गड्डी
  56. भाताची - लोंबी
  57. मधमाशांचा - थवा
  58. महिलांचे - मंडल
  59. माकडांची - टोळी
  60. मडक्यांची - उतरंड
  61. माणसांचा - जमाव,घोळका,समुदाय.
  62. माणसांची - गर्दी, झुंबड
  63. मुलांचा - घोळका
  64. मेढ्यांचा - कळप
  65. यात्रेकरूंची - जत्रा
  66. रुपयांची, नाण्याची - चळत
  67. लाकडाची, उसाची - मोळी
  68. वस्तूंचा - संच
  69. वह्या-पुस्तकांचा - गठ्ठा, ढीग.
  70. वाद्यांचा - वृंद
  71. विद्यार्थ्यांची - तुकडी, इयत्ता,गट
  72. विमानांचा - ताफा
  73. वेलींचा - कुंज
  74. साधूंचा - जथा
  75. सैनिकांची - पलटण, तुकडी, पथक
  76. हत्तीचा - कळप
  77. हरणांचा - कळप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा