जोडशब्द । Marathi Jodashabd

जोडशब्द

    शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून काही शब्दांची पुनरावृत्ती केली जाते. एकाच अर्थाचे दोन शब्द जोडून तयार होणारे 'जोडशब्द' असतात. मराठी 'जोडशब्द' आणि 'जोडाक्षरे' या दोघांमध्ये नेहमी गोंधळ झालेला पाहायला मिळतो. ह्या दोन्ही वेगळ्या संकल्पना आहेत. जोडशब्दात दोन वेगळे शब्द एकत्र जोडलेले असतात. ह्यात दोन्ही शब्दांचा अर्थ एक सारखा असतो तर कधी एक शब्द महत्त्वाचा तर दुसरा शब्द हा अर्थहीन असतो. कधी कधी दोन भिन्न अर्थपूर्ण शब्द एकत्र करून वेगळा अर्थ असलेला जोडशब्द होतो. तर जोडाक्षरामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक अक्षरे जोडून शब्द तयार झालेला असतो. 

 मराठी व्याकरणात जोडशब्दांना खूप महत्व आहे. स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा इत्यादि परीक्षेत जोडशब्द या विषयावर दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जोडशब्दांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. या करिता खालील तक्त्यात २०० पेक्षा अधिक जोडशब्द देण्यात आलेले आहेत.

  • अंगत - पंगत
  • अंगारे - धुपारे
  • अक्राळ - विक्राळ
  • अघळ - पघळ
  • अचकट - विचकट
  • अथरूण - पांघरूण
  • अर्धा - मुर्धा
  • अळम -टळम
  • अवती - भवती
  • आंबट - चिंबट
  • आई - वडील
  • आकांड - तांडव
  • आगत - स्वागत
  • आडवा - तिडवा
  • आदळ - आपट
  • आरडा - ओरडा
  • इकडे - तिकडे
  • इडा - पिडा
  • उघडा - बोडका, नागडा
  • उधळ - माधळ
  • उधार - उसनवार
  • उरले - सुरले
  • एकटा - दुकटा
  • ऐस - पैस
  • ओढा - ताण
  • ओबड - धोबड
  • औरस - चौरस
  • कच्ची - बच्ची
  • कपट - कारस्थान
  • कपडा - लत्ता
  • कांदा - भाकरी
  • काट - कसर
  • काटे – कुटे
  • काना - कोपरा
  • कापड - चोपड
  • काबाड - कष्ट
  • काम - धंदा, काज
  • काळ - वेळ
  • काळा – कुट्ट, भोर, कुळकुळीत, सावळा
  • काळे - बेरे, निळे
  • किडूक - मिडूक
  • केर - वारा, कचरा
  • केरवारा - पोतेरे
  • कोड - कौतुक
  • खाच - खळगे
  • खाडा - खोड
  • खेळ - खंडोबा
  • गंमत - जंमत
  • गल्ली - बोळ
  • गल्लो – गल्ली
  • गाई – गुरे
  • गाठ - भेट
  • गुरे - ढोरे
  • गोड - धोड
  • गोडी - गुलाबी
  • गोर - गरीब
  • गोरा – गोमटा, गोबरा, गुबरा, मोरा, पान
  • गोळा - बेरीज
  • घर - दार
  • घरी - दारी
  • घरो - घरी
  • चंबू - गबाळे
  • चट्टा - मट्टा
  • चढ - उतार
  • चणे – फुटाणे
  • चहा - पाणी
  • चारा - पाणी
  • चाल - ढकल
  • चिडी - चूप
  • चुकत - माकत
  • चुकले – माकले
  • चूक - भूल
  • चेष्टा - मस्करी
  • चेहरा - मोहरा
  • चोळा – मोळा
  • चोळी - बांगडी
  • छान - छोकी
  • जप - जाप्य
  • जमीन - जुमला
  • जवळ - पास
  • जाई - जुई
  • जाड - जूड
  • जाडा - भरडा
  • जाळ - पोळ
  • जुना - पुराणा
  • जेवण - खाण
  • झाड - झुडुप
  • झाड - लोट
  • झाडू - पोतेरे
  • टंगळ - मंगळ
  • टक्के - टोणपे
  • टाप -टीप
  • टिवल्या - बावल्या
  • ठाक - ठीक
  • ठाव - ठिकाणा
  • डाम - डौल
  • डाव - पेच
  • ढकला - ढकली
  • तंटा - बखेडा
  • ताळ - मेळ
  • त्रेधा - तीरपीट
  • थट्टा - मस्करी
  • थांग - पत्ता
  • दंगा - धोपा
  • दंगा - मस्ती
  • दगा - फटका
  • दया - माया
  • दरे - खोरे
  • दाग – दागिने
  • दाणा - पाणी
  • दाणा - गोटा
  • दान - धर्म
  • दीन – दुबळे
  • देणे - घेणे
  • देव - धर्म, दर्शन
  • देव - घेव
  • देवाण - घेवाण
  • धड - धाकट
  • धन - दौलत
  • धष्ट - पुष्ट
  • धाक - धपटशा
  • धान्य - धुन्य
  • ध्यान - धारणा
  • ध्यानी - मनी
  • नशा - पाणी
  • नाच - गाणे
  • नाते - गोते
  • निळे - शार
  • पांढरा - शुभ्र, फटक
  • पाऊस - पाणी
  • पाट - पाणी
  • पान - सुपारी
  • पानो - पानी
  • पाला - पाचोळा
  • पाहुणा - रावळा
  • पिवळे - धमक
  • पीक - पाणी
  • पूजा - अर्चा, पाठ
  • पै - पैसा, पाव्हणा
  • पैसा - अडका
  • पोपट - पंची
  • पोरे - टोरे
  • पोरे - सोरे
  • फाटका - तुटका
  • फौज - फाटा
  • बाग - बगीचा
  • बाजार - हाट
  • बी - बियाणे
  • बेल - भंडार
  • भली - मोठी
  • भांडण - तंटा
  • भांडी - कुंडी
  • भाजी - भाकरी
  • भाजी - पाला
  • भिर - भिर
  • भूत - पिशाच्च
  • भूत - बाधा
  • भोळा - भाबडा
  • मजल - दरमजल
  • मनन - चिंतन
  • मारा - मारी
  • माल - पाणी
  • माल - मसाला
  • मीठ - भाकरी
  • मुले - बाळे
  • मुलं - बाळं
  • मोल - मजुरी
  • मौज - मजा
  • रस्तो - रस्ती
  • राग - रंग
  • रान - वन
  • रोख - ठोक
  • लग्न - कार्य
  • लवा - जमा
  • लांडी - लबाडी
  • लाकूड - फाटा
  • लाडी - गोडी
  • लाल - चुटुक, भडक
  • लुळा - पांगळा
  • वाईट - साईट
  • वाजत - गाजत
  • वाड - वडील
  • वादळ - वारे
  • वेणी - फणी
  • वेळ – काळ
  • व्रत - वैकल्य
  • शहाणा - सुरता
  • शेजारी - पाजारी
  • शेठ - सावकार
  • शेती - भाती, वाडी
  • सगे - सोयरे
  • सडा - सारवण, संमार्जन
  • सण - वार
  • सदा - सर्वदा.
  • सल्ला - मसलत
  • साथ - संगत
  • साधा - सुधा, भोळा
  • साफ - सफाई
  • सासर - माहेर
  • सेवा - चाकरी
  • सोने – नाणे
  • मोड - तोड
  • सोयरे - धायरे
  • सोवळे - ओवळे
  • स्नान - संध्या
  • हलकी - सलकी
  • हलके - फुलके
  • हवा - पाणी
  • हाल - अपेष्टा
  • हिरवे - गार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा