रूपक अलंकार (Metapher):-
उपमेय व उपमान यात एकरूपता आहे ती भिन्न नाहीत. असे वर्णन जेथे असते तेथे रूपक हा अलंकार होतो. यालाच इंग्रजीमध्ये Metapher असे म्हणतात.
  उदाहरणार्थ:-
- बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी
 अमृताची वृष्टी मज होय
- उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा 
 दावि मुखचंद्रमा सकळियांसी
- लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.
- देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर ।।
- नयनकमल उघडीत हलके जागी हो जानकी
- देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना।
 सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना।।
- भवसागर तरुण जाणे हे गृहस्थाश्रमातील माणसाला फार कठीण आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा